Police bharti महाराष्ट्र पोलीस भरती 2025: राज्यात १५ हजार पोलिस कॉन्स्टेबलची पदे, जिल्ह्यानुसार जागा पहा
महाराष्ट्रातील पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाने पोलीस दलातील तब्बल १५ हजार पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील हजारो युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यापैकी हा पोलीस भरतीचा निर्णय सर्वाधिक चर्चेत आला आहे. महाराष्ट्र डीजीआयपीआरच्या अधिकृत एक्स हँडलवरून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पोलिसांच्या रिक्त पदांबाबत भरतीची घोषणा केली होती. त्यापूर्वीच, जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचा प्रस्ताव मांडला होता, तसेच १५ सप्टेंबर रोजी मैदानी चाचणी घेण्याचे संकेत दिले होते.
तथापि, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज प्रक्रिया, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे कठीण असल्याचे समितीने स्पष्ट केले होते. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर भरती प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


