या जिल्ह्यात १०१ कोटींचा पीक विमा परतावा खात्यात जमा यादी जाहीर! येथे चेक करा PM Fasal Bima Yojana

 

 

 

 

 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PM Fasal Bima Yojana) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १०१ कोटी २८ लाख ८६ हजार रुपयांचा पीक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील नुकसानीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

विमा परतावा वितरण

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत राजस्थानमधील झूंझूनू येथून थेट वितरण पद्धतीने हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला. गेल्या वर्षी, २०२४ मध्ये, नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसला होता. विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

 

 

या नुकसानीची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत २५ टक्के भरपाईची अधिसूचना जारी केली होती. याच अधिसूचनेनुसार, आता शेतकऱ्यांना हा विमा परतावा मिळत आहे.

 

 

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

एकूण ४०१ कोटींचा निधी मंजूर

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात यापूर्वीच मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकाअंतर्गत २५८.२९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, ज्यापैकी २५४ कोटी रुपये आधीच वितरित झाले आहेत. आता १०१ कोटींचा परतावा जमा झाल्याने, जिल्ह्यात मंजूर झालेल्या एकूण ४०१ कोटी १९ लाख रुपयांपैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.

 

 

Leave a Comment