कपलने एकमेकांना मिठी मारून नदीत उडी मारली अ न् धडकी भरवणारा VIDEO

 

 

 

 

 

Couple dangerous river jump सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील बनवून प्रसिद्धी मिळवणारे अनेक जण आहेत, ज्यांनी यातून आपलं आयुष्यच बदलून टाकलं आहे. आज असे लोक लाखो-कोटी रुपये कमवत आहेत. मात्र, प्रसिद्धीच्या या हव्यासापोटी अनेकदा जीव धोक्यात घालणारे व्हिडिओही समोर येतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, ज्यात व्हिडिओ बनवताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, बाईकवर किंवा कारवर स्टंट व्हिडिओ शूट करताना अनेक तरुण-तरुणी दिसतात.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

https://x.com/imnatasha09/status/1953708965671616658

 

पण, काही वेळा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका, अशा सूचना वारंवार दिल्या जातात, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कित्येकदा लोकांना जीव गमवावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका जोडप्याने रील बनवण्यासाठी चक्क पाण्यात उडी मारली. हा व्हिडिओ एका पुलावर चित्रित करण्यात आला आहे. यामध्ये एक जोडपं पुलावर उभं राहून एकमेकांना मिठी मारतं आणि त्यानंतर थेट नदीत उडी मारतं.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

https://x.com/imnatasha09/status/1953708965671616658

 

 

सुदैवाने, नदीत जास्त पाणी नव्हतं आणि त्या दोघांनाही पोहता येत होतं, त्यामुळे ते वाचले आणि थोड्याच वेळात पोहत किनाऱ्यावर आले. अशाप्रकारे स्टंटबाजीचा अतिउत्साह जीवावर बेतू शकतो. प्रसिद्धीसाठी असे धोकादायक स्टंट

करणं टाळायला हवं.

 

Leave a Comment