8वा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर: लेवल-6 (GP-4200), बेसिक पगार ₹35,400 वरून किती होणार पगार? जाणून घ्या सविस्तर हिशोब
8वा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर: लेवल-6 (GP-4200), बेसिक पगार ₹35,400 वरून किती होणार पगार? जाणून घ्या सविस्तर हिशोब
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
8वा वेतन आयोग वेतन कॅल्क्युलेटर: लेवल-6 (GP-4200), बेसिक पगार ₹35,400 वरून किती होणार पगार? जाणून घ्या सविस्तर हिशोब
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
8th Pay Commission Marathi:
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या वेतन आयोगात वेतनवाढ किती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण लेवल-6 (ग्रेड पे ₹4200) असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार नवीन आयोगात किती वाढेल, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
वेतन आयोगात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर. याचाच्या आधारे नवीन बेसिक पगार ठरतो. 7व्या आयोगात हा फॅक्टर 2.57 होता. 8व्या वेतन आयोगासाठी सध्या 1.92 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरला जात आहे.
सविस्तर पगार हिशोब (लेवल-6, बेसिक ₹35,400)
1. नवीन बेसिक पगार
₹35,400 × 1.92 = ₹67,968
म्हणजेच बेसिक पगार सुमारे ₹68,000 होईल.
2. भत्ते (Allowances)
DA (महागाई भत्ता): नवीन आयोग लागू झाल्यावर प्रारंभी DA शून्य असतो. त्यामुळे सध्या DA = ₹0
HRA (घरभाडे भत्ता): X वर्गातील शहरासाठी बेसिकचा 30% म्हणजे ₹67,968 चा 30% = ₹20,390
TA (प्रवास भत्ता): ₹3,600 (X शहरासाठी)
एकूण ग्रॉस पगार:
बेसिक पगार: ₹67,968
HRA: ₹20,390
TA: ₹3,600
DA: ₹0
➤ एकूण ग्रॉस सैलरी = ₹91,958
कपात (Deduction):
NPS (10% बेसिक + DA वर): ₹67,968 × 10% = ₹6,797
CGHS (आरोग्य सुविधा): अंदाजे ₹450
➤ एकूण कपात: ₹6,797 + ₹450 = ₹7,247
नेट सैलरी (हातात येणारा पगार):
ग्रॉस सैलरी: ₹91,958
कपात: ₹7,247
➤ नेट सैलरी (In-Hand): ₹84,711 दरमहा
महत्त्वाची टीप
या हिशोबात इनकम टॅक्सची कपात समाविष्ट केलेली नाही, कारण ती प्रत्येकाच्या गुंतवणूक व एकूण उत्पन्नावर अवलंबून असते.
जर 8व्या वेतन आयोगात 1.92 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला, तर लेवल-6 (GP-4200) असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार ₹84,711 दरमहा होऊ शकतो, जो सध्या मि
ळणाऱ्या पगाराच्या तुलनेत मोठी वाढ असेल