पाण्याची टाकी न रिकामी करता फक्त ५ मिनिटांत करा स्वच्छ; टाकीत उतरायची गरजच नाही! पाहा भन्नाट जुगाड! Clean Water Tank at home
घरात पाण्याची टाकी असतेच, आणि ती स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण टाकीतूनच आपल्याला रोजचं पिण्याचं, स्वयंपाकाचं आणि अंघोळीचं पाणी मिळतं. पण अनेकदा आपण टाकी स्वच्छ करत नाही, आणि त्यात गाळ साचतो. वरून पाणी कितीही स्वच्छ दिसलं तरी त्यात चिखल, धूळ आणि मातीचे कण मिसळलेले असतात. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
टाकी स्वच्छ करायची म्हणजे पाणी पूर्ण रिकामं करावं लागतं, आत उतरून ती घासावी लागते किंवा बाहेरून सफाई करणाऱ्या लोकांना बोलवावं लागतं. पण आता एक असा सोपा उपाय आहे, ज्यामुळे ना टाकी रिकामी करावी लागते ना आत उतरावं लागतं – आणि तरीही गाळ आरामात बाहेर काढता येतो.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
खालील भाग (साधारण दोन बोटं अंतर) कापून घ्या.
त्या कापलेल्या भागाला खालून बारीक चिरा करा – कात्री वापरून हे सहज शक्य होतं.
आता एक बारीक पीव्हीसी पाईप घ्या आणि त्याच्या एका टोकाला ही बाटली नीट चिकटवा. (चिकटपट्टीने मजबूत जोडा)
दुसऱ्या टोकालाही पाईप जोडू शकता – यामुळे हाताळायला सोपं जाईल.
हे उपकरण तयार झाल्यावर, त्यात पाणी भरून घ्या म्हणजे पाईपमध्ये पूर्ण पाणी भरलं जाईल. नंतर बाटलीचं टोक टाकीत घालून गाळ असलेल्या भागात फिरवा. पाण्याच्या दाबामुळे आणि तयार केलेल्या व्हॅक्युममुळे गाळ आपोआप बाहेर खेचला जाईल. तुम्हाला तोंडाने काही खेचायची गरजच नाही.
जर टाकी खूपच घाण झाली असेल तर शेवटी हायड्रोजन पेरोक्साईड नावाचं केमिकल वापरू शकता. हे रसायन टाकी निर्जंतुक करण्यात उपयोगी ठरतं. पण हे केवळ पाण्याचा वापर थांबवल्यानंतरच वापरावं. टाकी पूर्ण स्वच्छ केल्यानंतर, १५–३० मिनिटांनी ५०० मि.ली. हायड्रोजन पेरोक्साईड त्यात टाका.
टीप: हा उपाय सोपा आणि कमी खर्चिक असून घरच्या घरी सहज करता येतो. वेळोवेळी अशी स्वच्छता केल्यास आरोग्य चांगलं राहील आणि टाकीमधून स्वच्छ पाणी मिळेल.
https://youtu.be/GVpnY2kBLKE?si=v3qX-en62QAFoiM1
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा